अहमदनगर जिल्हा वाचनालय

अहमदनगर जिल्हा वाचनालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय आहे. इंग्रज अधिकारी कॅ. पी. टी. फ्रेंच यांनी १८३८ साली या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. सुरुवातीला जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावाने स्थानिक लोकांच्या सहभागाने व स्थानिक लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या वाचनालयाचे सिटी लायब्ररी असे नामकरण झाले या नंतर काळांतराने अहमदनगर जिल्हा वाचनालय असे संबोधण्यात येवू लागले. या वाचनालयाच्या जडण घडणीत अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले आहे. यात तात्या चिंचोरकर, डॉ. रानडे, ना. धो. नानल, डॉ. अविनाश गुणे, श्री. दादा उर्फ दत्तोपंत डावरे. यांचा उल्लेख आवर्जुन करणे क्रमप्राप्त आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाचनालयास वेळोवेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत व वाचनालयाच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. आज अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, प्रमुख कार्यवाहक श्री. विक्रम राठोड, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, उपाध्यक्ष श्री. अजित रेखी तर खजिनदार श्री. तन्वीर खान सहकार्यवाह श्री. उदय काळे हे पदाधिकारी व सदस्य मंडळ वाचनालयाच्या कार्याची धुरा प्रभावीपणे पेलत आहेत. पुढे वाचा

आमची वैशिष्टये

वेळ
कामाच्या वेळा : सकाळी 9:30 ते दुंपार 12:30 वाजेपर्यंत,
संध्याकाळ 4:30 ते संध्याकाळ 8:00 पर्यंत, रविवार बंद

 

उच्च दृश्यमानता आणि शांतता वातावरण

आम्ही 3000+ आहेत
3000 अधिक सदस्य

Whatsapp_Channel

Stay updated with the latest news and events from Ahilyanagar District Library!

Join our official What’s App Channel for regular updates. Simply scan the provided QR code to become a part of our community and never miss an important announcement.

अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालयातील ताज्या बातम्या आणि घडामोडींबद्दल अपडेट राहा!

नियमित अपडेट्ससाठी आमच्या अधिकृत What’s App  चॅनेलमध्ये सामील व्हा. आमच्या समुदायाचा भाग होण्यासाठी आणि कधीही महत्त्वाची घोषणा चुकवू नका.

You can also join our What’s App channel by just clicking on link given below.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या What’s App चॅनेलमध्ये सामील होऊ शकता.

https://whatsapp.com/channel/0029Vb5sXb24o7qSDQNyob1S